Ad will apear here
Next
‘मेगा क्लस्टरबाबतच्या सर्व समस्या सोडवणार’
सोलापूर : ‘सोलापुरात मंजूर झालेल्या मेगा क्लस्टरसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असून, वस्त्रोद्योग उद्योजकांच्या सर्व समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर आपली बलस्थाने वापरून वस्त्रोद्योग व्यवसायाला पुनर्वैभव प्राप्त करून देणार,’ असे आश्वासन  सहकार तथा वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

पॉवरलूम टेक्स्टाईल मेगा क्लस्टरसंदर्भात १९ मे रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गोस्की, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरा, सचिव संजय मडूर, खजिनदार गोवर्धन चाटला, सदस्य जयंत आकेन, गोविंद बुरा, राजेंद्र अंबळढगे, गोविंद झंवर आदी उपस्थित होते.

‘सोलापुरातील वस्त्रोद्योग म्हणजेच टॉवेल आणि चादर उत्पादकांच्या व्यवसायवाढीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. तरूण उद्योजकांना या व्यवसायाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान तसेच मार्केटिंगचा योग्य वापर करावा, आपल्या वस्त्रोद्योग मंत्रीपदाच्या कार्यकाळात चादर व टॉवेल उत्पादकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल,’ असे देशमुख यांनी सांगितले.

या वेळी मेगा क्लस्टरसाठी चिंचोळी एमआयडीसी येथील जागा उपलब्धता, आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग महोत्सव, व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, अक्कलकोट एमआयडीसी येथील समस्या, व्यापारी संकुल, ड्राय पोर्ट आदी बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

‘अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये स्वच्छता राखली जात नाही; तसेच झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ओसाड वाटते. यामुळे सर्व उद्योजकांनी परिसरात स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण चळवळ सुरू केली पाहिजे. त्यानंतरच येथील स्थिती बदलण्यास मदत होईल. या मोहिमेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहू,’ अशी सूचना देशमुख यांनी उपस्थित उद्योजकांना केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZPNBO
Similar Posts
भंडिशेगाव येथे सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण सोलापूर : ड्रीम फाउंडेशन, भंडिशेगाव ग्रामपंचायत (ता. पंढरपूर), वन विभाग, पंचायत समिती व महसूल विभाग या सर्वांच्या माध्यमातून भंडिशेगाव येथील ४२ एकर गायरान पडीक जमिनीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रीम फाउंडेशनचे अजित कंडरे होते.
‘विकासासाठी शासन तत्पर’ सोलापूर : ‘दक्षिण सोलापूर तालुक्यातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पाणीपुरवठा, रस्ते विकास, जलयुक्त शिवार अशा विविध योजनांच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन तत्पर आहे,’ असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले
‘दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळावी’ पंढरपूर : ‘राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून, शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी, असा आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’ सोलापूर : ‘सोलापूर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक व्हावी, त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी पणन मंडळामार्फत सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे,’ अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language